BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिके अंतर्गत 1,342 पदांची भरती जाहिरात 2024

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिके अंतर्गत शिक्षण विभागात एकूण 1,342 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पात्र उमेदवारांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी शिक्षकांची तब्बल 1,342 पदे भरण्यात येणार आहेत, त्याकरिता शिक्षण विभागाने जाहिरात दिली असून रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टल द्वारे भरण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी गेल्या काही वर्षांत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात.

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या 1129 शाळांमध्ये मिळून सध्या तीन लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. करोनाकाळानंतर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तरी सध्या तासिका तत्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे. परंतु, या भरतीमुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळतील, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केली.

पात्र उमेदवारांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

कोणत्या माध्यमांसाठी किती पदे

  • इंग्रजी – 698
  • हिंदी – 239
  • मराठी – 216
  • उर्दू- 189

मुलाखत शिवाय जाहिरात पहा

मुलाखत जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज लिंक

ऑनलाईन अर्ज लिंक

Leave a Comment