घरात शिरला बिबट्या अन् चिमुरड्या ने केली कमाल! पहा चित्त थरारक दृश्य..!

Leopard in the house : “देव तारी त्याला कोण मारी” असाच काही प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. पोस्टर मध्ये दिसत आहे त्या प्रमाणे घरात एक लहान लेकरू मोबाईल सोबत खेळत आहेत आणि अचानक घरात बिबट्या आला आहे.

ही घटना आहे महाराष्ट्रातील मालेगाव येथील एक अल्पवयीन मुलगा तो बसलेल्या बँक्वेट हॉलमध्ये बिबट्या घुसल्याने तो थोडक्यात बचावलेला आहे. त्या घरातील हॉलचा मुख्य दरवाजा उघडा होता, आतमध्ये 12 वर्षीय मुलगा मोबाईलवर गेम खेळत असताना ही घटना घडली. बिबट्या खोलीत शिरल्याचे पाहताच मुलाने बाहेर धावून दरवाजा लावून घेतलेला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.

व्हिडिओ पहा 👇

या घटनेच्या व्हिडिओमध्ये बँक्वेट हॉलच्या बाहेर बघ्यांची गर्दी होताना दिसत आहे. अल्पवयीन मुलाने अलार्म लावताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला शांत केले. नंतर पिंजऱ्यात टाकण्यात आले. पत्रकारांशी बोलताना मुलाने सांगितले की, जेव्हा बिबट्या आत आला तेव्हा तो बँक्वेट हॉलच्या दरवाजाजवळ बसला होता. मुलाने समोरून दरवाजा बंद करून वडिलांना सदरील घटनेची माहिती दिली.

Leave a Comment