LPG गॅस च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

LPG Gas Cylinder New Rate : मागील महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. 1 एप्रिलपासून 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 35 रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्या अगोदर सलग तीन महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत होती.

सोन्याच्या किमती झाल्या कमी, 10 ग्रॅम सोने 52,480/- रुपयांना, पहा सविस्तर

तेल कंपन्यांनी 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 19 रूपयांनी कमी केल्या आहेत. यासह 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,745 रुपये इतकी झाली आहे. या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

SBI च्या या योजनेद्वारे तुम्हाला मिळतील 12,000/- रुपये, पहा योजना

1 मे पासून राजधानी दिल्लीत 9 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी (दिल्ली एलपीजी किंमत) कमी झाली आहे आणि त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांवर आली आहे.

घरगुती गॅस मध्ये कोणताही बदल नाही

7 मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. महिला दिनानिमित्त [8 मार्च 2024] एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती.

CIBIL score कमी असला तरी येथे मिळेल तुम्हाला कर्ज

Leave a Comment