LPG Gas Subsidy : 1 एप्रिल 2024 पासून LPG गॅस वर मिळणार 300 रुपयांची सबसिडी, जाणून घ्या डिटेल्स

LPG Gas Subsidy : केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त 100 रुपयांनी स्वस्त केला होता. या सवलतीमुळे आता LPG सिलेंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे.

एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घसरण होणार असल्याची बातमी आहे.

वर्षभरात 12 सिलिंडर वर मिळणार सूट

प्रत्येक वेळी लाभार्थींना वर्षभरात 12 सिलिंडर दिले जातात. या अंतर्गत 14.2 किलो सिलेंडर मागे 300 रुपये सबसिडी दिली जाते. अनुदान थेट पात्र लोकांच्या खात्यात येते. अशा प्रकारे, उज्ज्वला लाभार्थ्यांना सामान्य लोकांपेक्षा 300 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळतात. या योजनेवर सरकारला 12 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

कोणाला मिळणार सबसिडी

  • दारिद्र्यरेषे खालील कुटुंब
  • (BPL) कुटुंबे
  • (AAY) अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी
  • PMUY अंतर्गत अर्ज करणारे लाभार्थी

गॅस सबसिडी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधारशी लिंक बँक खात्यात जमा केले जाईल. अनुदानाची रक्कम 300 रुपये प्रति 14.2 किलो सिलिंडर असून एका वर्षात 12 सिलिंडर वर दिली जाणार आहे.

वेबसाईट पहा

अधिक माहिती येथे वाचा

ही सबसिडी सूट 31 मार्च 2024 पर्यंत होती परंतु अलीकडेच सरकारने ही सवलत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. हे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल.

ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लक्षात घेऊन सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेचे 1 मार्च 2024 पर्यंत 10.27 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 60 टक्के एलपीजी आयात करतो. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ग्राहकांचा सरासरी एलपीजी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 29 टक्क्यांनी वाढून 2023-24 (जानेवारी 2024 पर्यंत) 3.87 रिफिल झाला आहे.

Leave a Comment