पोस्ट ऑफिस च्या झक्कास योजनेत दररोज 100 रुपये गुंतवा आणि 2 लाख 14 हजार 97 रुपये परतावा मिळवा.

पोस्ट ऑफिस च्या झक्कास योजनेत दररोज 100 रुपये गुंतवा आणि 2 लाखाहून अधिक परतावा मिळवा. Post Office RD Scheme

पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक म्हणजे सुरक्षिततेची 100 टक्के हमी ! आपण पोस्ट ऑफिस च्या अश्या योजने बद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्ही दररोज 100 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला मुदत पूर्ती नंतर 2 लाख 14 हजार रुपये मिळणार आहेत.

पोस्तुट ऑफिस च्या या योजनेत तुम्ही जर दररोज 100 रुपये जमा केल्यास तुमची एका महिन्यात 30 दिवसांत 3 हजार रुपये जमा होतात. आणि ही रक्कम तुम्ही दरमहा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकता. पोस्ट ऑफिस ही सरकारी बँक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यामुळे येथे पैसे गुंतवणे म्हणजे सुरक्षिततेची पूर्ण हमी आहे.

पोस्याट ऑफिस च्या या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गरीब वर्गातील किंवा श्रीमंत व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

जर तुम्हीही रक्कम 12 महिने म्हणजेच 1 वर्षासाठी जमा केली तर तुमची एकूण रक्कम 36 हजार रुपये होईल. आणि जर तुम्ही ही रक्कम 5 वर्षांसाठी जमा केली तर एकूण रक्कम 1 लाख 80 हजार रुपये होते.

पोस्ट ऑफिस RD scheme व्याजदर

पोस्ट ऑफिसची हि RD scheme 5 वर्षांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला 6.7 % व्याज दिले जाते. जर तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये जमा केले, तर एकूण ठेव रक्कम 1 लाख 80 हजार रुपये होईल. त्यामुळे या ठेव रकमेवर तुम्हाला मिळणारा एकूण व्याजदर 34,097/- रुपये आहे. 5 वर्षानंतर ही एकूण मॅच्युरिटी रक्कम 2,14,097 रुपये आहे. post office RD scheme

01/01/2024 पासून पोस्ट ऑफिस RD scheme मध्ये गुंतवणूक दारांना 6.7 % व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्हाला जर मुदत पूर्वी RD मधून रक्कम काढून घेयची असेल तर तुम्ही तीन वर्षानंतर ती काढून घेऊ शकता. तसेच तुम्हाला खाते उघडायचे असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संपर्क साधा.

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment