PM Kisan 17th Installment : 31 मार्च पूर्वी करा हे काम; तरच Pm किसान चा 17 वा हप्ता होणार जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जारी (pm kisan samman nidhi yojna) केलेला आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. तर काही शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. आता या योजनेच्या 17 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी करणे आवश्यक आहे. PM Kisan 17th Installment

पीएम किसान योजनेद्वारे, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 ची आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून ते त्यांच्या शेतीचा खर्च कमी करू शकतील. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते आणि शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी एक हप्ता मिळतो.

सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आगाऊ सन्मान निधीचा हप्ता मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. 31 मार्च 2024 पर्यंत तुमचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करा आणि सन्मान निधीचे लाभ घ्या. पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करू शकतात. पीएम किसान मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) द्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शेतकरी ई-केवायसी करू शकतात. pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी OTP द्वारे ई-केवायसी देखील करू शकतात.

ॲपद्वारे ई-केवायसी करा

Google Play Store वरून PM किसान ॲप डाउनलोड करा आधार क्रमांक आणि लाभार्थी आयडी टाकून ॲपवर लॉग इन करा.

मोबाईल नंबर वर मिळालेला OTP टाका फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुमचे ई-केवायसी पूर्ण करा.

येथे करा E-kyc

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment