Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी जाहीर केले नवे दर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल आजचे दर

Petrol-Diesel Price Today : आजकाल कच्च्या तेलाची किंमत 85-86 डॉलर प्रति बॅरल आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर बरेच अवलंबून असतात, कारण पेट्रोल आणि डिझेल यापासून बनवले जाते. अलीकडेच, 15 मार्च रोजी, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती, ज्या अंतर्गत दोन्हीच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केल्या होत्या.

केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत अनेक महिन्यांपासून अटकळ होती, ज्याची सरकारने 15 मार्च रोजी अंमलबजावणी केली. आता सर्व तेल कंपन्यांनी 30 मार्च 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

महानगरे आणि देशातील काही निवडक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय आहे ते जाणून घेऊया (petrol Disel Price today

तेल कंपन्यांनी 30 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर काय आहेत ते पुढे पाहु.

पेट्रोल चे दर

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपयांवरून 94.72 रुपयांवर आली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 रुपयांऐवजी 104.21 रुपये झाली आहे.

कोलकात्यात 106.03 रुपयांऐवजी 103.94 रुपये आहे.

चेन्नईमध्ये 102.63 रुपयांऐवजी 100.75 रुपये झाले आहे.

डिझेल चे दर

नवी दिल्लीत किंमत 89.62 रुपयांऐवजी 87.62 रुपये झाली आहे.

मुंबईत किंमत 94.27 रुपयांऐवजी 92.15 रुपये दर आहे.

कोलकात्यात डिझेलची किंमत 92.76 रुपयांऐवजी 90.76 रुपये

चेन्नईमध्ये 94.24 रुपयांऐवजी 92.32 रुपये झाली आहे.

अधिक माहिती येथे वाचा

मोबाईल वर मिसकॉल देऊन पेट्रोल- डिझेल ची किंमत तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला सहज कळू शकतात. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर जावे लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्ही RSP सोबत 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवू आजचे पेट्रोल डिझेल चे दर तपासू शकता.

Leave a Comment