जमीन मोजायची आहे का ? आता घरूनच करा ऑनलाईन अर्ज

Online Land mesurement : शेतीशी निगडित कामे म्हणजे खूप धावपळीचे काम असते तसेच शेतकऱ्यांना हातातले काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागते.

भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे आता ऑफिसला जायची गरज नाही, शेतकऱ्यांना आता घरातूनच जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Mahabhumilekh.gov.in या संकेत स्थळावरून तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा पाहून जमीन किती आहे, हे समजते. मात्र अनेकदा सातबाऱ्यावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते, अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याय असून त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.

जमीन मोजणीसाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम गुगलला ई मोजणी भूमी अभिलेख असे सर्च करा
  • https://emojni.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा
  • मेन मेनू मधील ‘नागरिकांसाठी‘ या पर्याय वर क्लिक करानवीन नागरिक नोंदणी म्हणून पर्याय दिसेल.
  • या ठिकाणी तुम्ही मोजणीसाठी नोंदणी करू शकता.

जमीन मोजणीचे तीन प्रकार आहेत.

  • साधी मोजणी – ही मोजणी सहा महिन्यांच्या कालावधीत केली जाते. साधी मोजणी एक हेक्टर साठी करायची असल्यास एक हजार रुपये फी आहे.
  • तातडीची मोजणी – तातडीची मोजणी ही तीन महिन्यांपर्यंत करावी लागते. आणि तातडीच्या मोजणीसाठी एक हेक्टर दोन हजार रुपये फी आहे.
  • अति तातडीची मोजणी – अती तातडीची मोजणी ही दोन महिन्यांच्या आत केली जाते. तसेच अति तातडीच्या मोजणीसाठी तीन हजार रुपये फी आकारली जाते.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्रे

  • जमिनीचा सातबारा
  • नकाशा
  • खातेदाराचे नाव व पत्ता
  • चलन भरल्याची पावती

जमीन मोजणीसाठी भूमिअभिलेख महाराष्ट्र या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन मोजणी ई प्रणाली

भूमीअभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्जदार यांना घरबसल्या, सेतु केंद्रातून खाजगी व्यावसायिक इंटरनेटच्या माध्यमातुन तसेच कार्यालयातुन मोजणीचा अर्ज भरता येणार आहे.

तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल, तुम्ही तो टोकन क्रमांक आणि 7/12 घेवून भूमि अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज भरुन घेण्याची संपुर्ण कार्यवाही केली जाईल.

आणि विहित मुदतीत भूमी अभिलेख कार्यालय मार्फत तुमच्या जमिनीची मोजणी केली जाते.

डिजिटल नकाशे मिळणार

भूमिअभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांना जमिनीचा नकाशा उपलब्ध करून देण्यात येतो. ऑनलाइन सातबारा, नमुना आठ, फेरफार यासह सर्व्हे नंबर दिल्यास गावाचा नकाशा महाभूमी अभिलेख या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतो.

अधिक माहितीसाठी येथे वाचा

Leave a Comment