[DCPS] परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसाठी कर्मचाऱ्यांकरिता निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय

DCPS Employees Shasan Nirnay : सन 2023-24 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेत्तन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 28 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची कार्यपध्दती संदर्भ क्र.1 च्या शासन निर्णयान्वये विषद केली आहे.

शासन निर्णय पहा

सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी संदर्भ क.2 अन्वये लेखाशीर्ष उधळण्यात आलेली आहे. संदर्भ क्रं 4 व संदर्भ क्र.5 अनुक्रमे शिक्षण सहसंचालक, (प्राथमिक), पुणे व शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. संदर्भ क्र.३ अन्वये वित्त विभागाने सुधारित अंदाजाच्या मर्यादेत १०० टक्के तरतूद उपलब्ध करुन दिली आहे.

त्या मर्यादेत सन २०२३-२४ मध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतंर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पुढील प्रमाणे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद बीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

येथे पहा सविस्तर माहिती

Leave a Comment