शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 26 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई वाटप, GR आला

Crop Damage Compensation GR : राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.

तथापि, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.०२.११.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रू. 10664.94 लक्ष (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आली होती.

परंतु दिनांक 27 मार्च 2024 रोजी या संदर्भात महसूल व वन विभाग मार्फत शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रक्कम रु. 11239.21 लक्ष (रुपये एकशे बाराकोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त) इतकी करण्यात आली आहे, त्या सोबत सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे.

शासन शुद्धिपत्रक

21 फेब्रू. 2024 चा शासन निर्णय पहा

Leave a Comment