मोबाईल वर 7/12 उतारा आणि 8अ ऑनलाइन असा पहा

mahabhumilekh : तुमच्या शेत जमिनीचा 7/12 आणि 8 अ ऑनलाईन कसा पाहायचा ते पुढे सविस्तर पहा.

महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8अ उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही.

आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.

असा पाहा तुमच्या जमिनीचा 7/12 ऑनलाईन

  • ऑनलाईन सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in वर जा.

ऑनलाईन 7/12 येथे पहा

  • तुमचा विभाग निवडा
  • 7/12 पाहण्यासाठी तुमचा जिल्हा निवडा.
  • त्या नंतर तालुका आणि गाव निवडा.
  • 7/12 उतारा पाहण्यासाठी तुमच्या शेत जमिनीचा सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव नमूद करा.
  • गट नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.
  • 7/12 उतारा ऑनलाइन नोंदणीसाठी आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाईप करा.
  • त्यांनतर पुढे Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
  • 7/12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच mahabhulekh सातबारा(7/12) आपल्यासमोर उघडेल.

आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment