मान्सूनचा वेग, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

देशात मान्सून वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आपल्या अंदाजानुसार, IMD ने या भागात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईतील आयएमडी कार्यालयाने शनिवारी एक अलर्ट जारी केला असून, खराब हवामानामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

पुण्यात पुढील २४ तासांत, तर मुंबईत पुढील ४८ तासांत येण्याची शक्यता आहे. ९ जूनपासून मान्सून राज्यात वेगाने पसरू शकतो. पुढील पाच दिवस राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

मान्सून गुरुवारी राज्यात दाखल झाला.तो रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांमध्ये पोहोचला. पुढील २४ तासांत तो पुणे आणि मुंबईत येईल, असा अंदाज होता. पण, हवेचे दाब अनुकूल नसल्याने मान्सून थोडा थांबला. त्यामुळे शनिवारी सकाळी थोडा पुढे सरकत बारामतीला पोहोचला. त्यामुळे त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. पुढील २४ तासांत तो पुणे शहरात आणि पुढील ४८ तासांत मुंबईत येईल, असा अंदाज आहे.

आगामी २४ तासांत पुणे, तर पुढच्या ४८ तासांत मुंबईत येण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू भागात अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राज्यात दिसेल. त्यामुळे महाराष्ट्रातही ९ ते १३ जूनदरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी होईल. त्यामुळे ९ जून रोजी कोकण व मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यात घाटमाथ्यावर ९ जूनपासून पाऊस वाढणार आहे.

कोकण, घाटमाथा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे.

Leave a Comment