Mansoon Alert : जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ येऊन धडकणार महाराष्ट्राला

Mansoon Alert : महाराष्ट्रात 3 ते 4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. आज काही ठिकाणी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, अ. नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात 10 ते 13 एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. 10 ते 13 एप्रिल रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. अनेक ठिकाणी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी नवीन माहिती येथे पहा

Leave a Comment