1 एप्रिल पासून राज्यात स्मार्ट मीटर, वीज बिल येणार निम्मेच..!!

MSEDCL Smart Prepaid Meter : आता वीज बिल येणार अर्धेच येणार आहे, कारण 1 एप्रिल पासून राज्यात साध्या मीटर ऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.

जेवढा रिचार्ज कराल तेवढीच मिळेल वीज

स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाइल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशा पैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजेल.

म्हणजेच रिचार्ज प्रमाणे पैसे भरावे लागणार म्हणून ग्राहक काटकसरीने वीज वापरतील आणि त्यामुळे ग्राहकांचे लाईट बिल कमी येईल.

थकबाकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणने आता संपूर्ण राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची तयारी केली आहे.

पहिल्या टप्प्यात बिल वेळेवर न भरणाऱ्यांना प्रीपेड मीटर आणि उर्वरित ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर रिचार्ज केल्यावर वीज उपलब्ध होईल. या मीटरसाठी ग्राहकांना कोणताही निधी द्यावा लागणार नाही. मीटरचा खर्च केंद्र सरकारच्या अनुदानातून उचलला जाणार आहे.

महावितरण आरडीएसएस (रिवाइज्ड डिस्ट्रिब्युशन एरिया स्कीम) अंतर्गत मीटर बदलणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून राज्यभरात चार एजन्सी नेमण्यात आल्या आहेत.

प्रत्येक ग्राहकाचे वीज मीटर बदलण्याची तयारी महावितरणने केली आहे. यासोबतच वीजगळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ट्रान्सफार्मर आणि फिडरमध्ये स्मार्ट मीटरही बसवण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावर नियंत्रण ठेवता येईल, असा महावितरणचा दावा आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याचे काम ज्या कंपन्यांना मिळाले त्यांना 27 महिन्यांत मीटर बसवून 93 महिने देखभाल करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत कामाची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता उर्वरित राज्यात हा शुभ मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment