Shet rasta kayda ! शेतात जाण्यासाठी रस्ता हवाय का? असा करा तहसीलदार यांना अर्ज…

Shet rasta kayda : आपल्या सर्वांशी निगडित दळणवळण धोरण खूप महत्वाचे आहे. आपल्याला शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी किंवा दररोज शेतात जाण्या येण्यासाठी शेत रस्ता असणे गरजेचे आहे. तुमच्या शेतीसाठी शेत रस्ता हवा असेल आणि त्या करिता काय कायदा आहे हे जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत वाचा..

शेतकऱ्यांमध्ये शेतावरील बांध, रस्त्याच्या भांडणासाठी महसूल न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची संख्या वाढली आहे. वहिवाटीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांकडून हळूहळू दरवर्षी अतिक्रमण होत आहेत आणि या झालेल्या अतिक्रमणामुळे हे रस्ते नाहीसे झाले आहेत.

आणखी माहिती येथे वाचा

जमिनीच्या झालेल्या व्यवहारामुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले. म्हणून मूळ जमीन मालक बदलले गेले. त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदी दाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध राहत नाही.

शेत रस्ता करिता लागणारा अर्ज येथे डाऊनलोड करा

अश्या परिस्थितीत शेतातील माल किंवा वहिवाट करिता शेत रस्ता असणे गरजेचे आहे. स्वतःच्या शेत जमिनी मध्ये जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 146 नुसार इतर भूमापन क्रमांकाच्या सीमेवरून शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्याच्या अधिकार तहसीलदारांना देण्यात आला आहे.

त्यामुळे बाधित शेतकरी शेत रस्त्यासाठी तहसिलदाराकडे रस्ता मागणीचा अर्ज करू शकतात.

जुना वहिवाटिचा रस्ता असेल किंवा नकाशा मध्ये रस्ता नमूद असेल तर असा अतिक्रमण केलेला शेत रस्ता मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार सबंधित शेतकऱ्याला रस्ता करून देण्याचे अधिकार तहसिलदार यांना दिले आहेत.

शेत रस्ता करिता लागणारा अर्ज येथे डाऊनलोड करा

Leave a Comment