मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा साठी 30,000/- रुपये मिळणार

Tirth darshan Yojana : शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या आहेत. तसेच महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाची सोय करणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे 1500/- रुपये, या दिवशी खात्यात जमा होणार

महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना सरकारी खर्चाने तीर्थयात्रा घडवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला केली होती. अधिवेशनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना 30 हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल आणि सरकारी खर्चाने त्यांचे तीर्थाटन घडवले जाईल.

गॅस ग्राहक असाल तर हे काम लवकर करा, नहीतर गॅस सिलिंडर मिळणार नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रा योजनेस मान्यता देण्यात आली. या योजनेनुसार, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या धर्मस्थळांच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त 30 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळेल. या मदतीचे प्रमाण त्या नागरिकाच्या राहत्या ठिकाणापासून धर्मस्थळ किती दूर आहे, यावर ठरेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

राज्य सरकार ठरवेल की कोणत्या धर्मातील कोणत्या तीर्थस्थळांच्या पर्यटनासाठी वा तीर्थयात्रेसाठी मदत केली जाईल.

राज्य सरकारने धर्मनिहाय तीर्थस्थळांची यादी निश्चित केल्यानंतरच अशा प्रकारची मदत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळेल.

Leave a Comment