राज्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत दि. 22/04/2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित

Old Pension Scheme : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत दि. 22/04/2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक भत्ता वाटपाबाबत महत्वाचा शासन निर्णय येथे पहा

राज्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना शासन निर्णय पहा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी यांना सदरील शासन निर्णय अन्वये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.

या निर्णयानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत.

अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी आहेत, ज्यांची नियुक्ती राज्य शासनाच्या सेवेत दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे. अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सदरील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय

Leave a Comment