जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात, दि. 02/05/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात, दिनांक 02/05/2024 रोजी वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी विषयक बाबत दिनांक 30/04/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 02/02/2024 अन्यये दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृतिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल, हा नियम मोडल्यास 25,000/- रू. दंड, 01 जून पासून नवीन नियम लागू

दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती बाबत सदरील शासन निर्णय आहे.

नवीन माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 2 अनुसार दिनांक 01/11/2005 पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत.

नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.

सविस्तर माहितीसाठी पुढील शासन निर्णय पहा

शासन निर्णय

Leave a Comment