या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात दि. 14/02/2024 रोजीचे महत्वाचे नवीन परिपत्रक

Old pension scheme latest news : दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११..२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे बाबत उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक यांचे नवीन परिपत्रक जारी झाले आहे.

दि.०१.११.२००५ पुर्वी पदभरती जाहिरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. संबधित अधिकारी / कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याचा दिनांकापासुन ६ महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे.

जे राज्य शासकिय अधिकारी / कर्मचारी या ६ महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत. त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) लागू राहील.

सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने आपले गटात कार्यरत असलेले राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) लागू असलेले कर्मचारी यांनी जुनी पेंन्शन योजना लागू करण्याचा पर्याय दिलेला असेल अशा कर्मचारी यांचे प्रस्तावा समवेत खालील प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करण्यात यावी.

  • जुनी पेंन्शन योजना लागू करण्याबाबतचा विनंती अर्ज
  • विकल्प अर्ज
  • जि.प…. …जाहिरातीची छायांकित प्रत
  • प्रथम नियुक्ती आदेश छायांकित प्रत
  • शाळा प्राप्त / रुजु आदेश छायांकित प्रत
  • सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • NPS खाते क्रमांक छायांकित प्रत

जुनी निवृत्ती वेतन योजना संदर्भात उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक यांचे नवीन परिपत्रक आपण पुढे पाहू शकता.

Leave a Comment