7th pay commission : शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे बाबत शासन परिपत्रक

7th pay commission : शासकीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे बाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन सोबत देयके 7 वा वेतन आयोग 4 था हप्ता (राहिलेला 1, 2 व 3 रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य येथील कार्यालया कडून शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांना कळवण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य येथील कार्यालया कडून मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोगाचा (1,2, 3 हप्ता राहिला दि. 13/02/2024 रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र.220220442, 220220478, असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करणेबाबत परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.

7 व्या वेतन आयोगासाठी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. तसेच भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी असेल असे सदरील पत्रा अन्वये कळवण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment