या राज्यात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू..

Old pension scheme update : सध्या जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा खूप चर्चेत असताना सिक्कीम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आलेले आहे.

शुक्रवारी सिक्कीम चे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे.

या अगोदर पंजाब, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केलेली आहे. त्यांनतर आताच सिक्कीम या राज्यात सुद्धा परत जुनी पेन्शन योजना लागु केली आहे, म्हणजेच देशात एकूण 6 राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

31 मार्च 2006 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सिक्कीम सेवा (पेन्शन) नियम 1990 च्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी राज्याने जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वरील 6 राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment