Paytm FASTag 15 मार्चनंतर बंद होणार, असे मिळवा पैसे परत

केंद्र सरकारने ‘One Vehicle One Fastag’ म्हणजेच एका गाडीसाठी एकच फास्टॅग ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे एकच फास्टॅग वेगवेगळ्या गाड्यांसाठी किंवा एकाच गाडीवर वेगवेगळे फास्टॅग वापरता येणार नाहीत.

आरबीआयने 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेत असणारी खाती, पेटीएम वॉलेट आणि फास्टॅगमध्ये पैसे डिपॉझिट करण्यावर बंदी घातली आहे.

RBI ने निर्बंध लादल्यानंतर Paytm FASTag वापरकर्त्यांना 15 मार्च नंतर सध्याचे FASTag बंद करून नवीन उघडावे लागणार आहेत.

15 मार्च 2024 नंतर, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेला तुमचा FASTag टॉप-अप किंवा रिचार्ज करू शकणार नाही.

NHAI ने अधिकृत फास्टॅग पुरवणाऱ्या कंपन्यांच्या यादीतून पेटीएमला वगळले आहे. आता या सगळ्यांना त्यांचे फास्टॅग 15 मार्चच्या आधी डीअ‍ॅक्टिव्हेट करून घ्यावे लागणार आहेत.

अगोदरचा फास्टॅग डीअ‍ॅक्टिव्हेट करूनच नवीन फास्टॅगसाठी केवायसी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करता येणार आहे.

RBI ने पेटीएमच्या ग्राहकांसाठी काही FAQ म्हणजेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं प्रकाशित केली आहेत. त्यात त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की पेटीएम फास्टॅगवरील रक्कम दुसऱ्या बँकेच्या फास्टॅगवर ट्रान्सफर करता येणार नाही.

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना त्यांचे फास्टॅग निष्क्रिय करूनच पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. Paytam FASTag वर तुमचे पैसे असतील तर 15 मार्चच्या आधी तुम्हाला ते खर्च तरी करावे लागतील किंवा पेटीएम पेमेंट्स बँकेकडून रिफंड तरी मागावा लागणार आहे.

आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा

Paytam FASTag बंद करण्याची प्रोसेस

फास्टॅग डीअ‍ॅक्टिव्हेट करण्याअगोदर त्या मध्ये काही बॅलन्स असेल तर त्याचा रिफंड पेटीएम पेमेंट्स बँकेकडून मिळवता येतो. यासाठी पेटीएमच्या अ‍ॅपमधून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता किंवा 1800-120-4210 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही रिफंड मिळवू ही मिळवू शकता.

  • Paytam चे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या पेटीएम खात्यात लॉग इन करा. अगोदरच तुमचे खाते नसेल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून लगेच एक खाते बनवता येते.
  • पुढे सर्च बॉक्समध्ये Fastag सर्च करा आणि Manage Fastag च्या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Help & Support’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Need help with on-order related queries?’ हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर ‘Queries related to updating the FASTag profile’ या पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटी ‘I want to close my FASTag’ या पर्यायाची निवड करा.
  • त्यानंतर पुढे स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा त्यानंतर आपले फास्टॅग खाते लगेच निष्क्रिय होऊन जाईल.

नवीन FASTag खाते कसे उघडाल

NHAI म्हणजेच National Highways Authority Of India ने एकूण 32 बँकांना अधिकृत फास्टॅग वितरक म्हणून मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे NHAI च्या वेबसाईटवर जाऊन किंवा संबंधित बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग खरेदी करू शकता. बहुतेक राष्ट्रीयीकृत आणि मोठ्या खासगी बँका फास्टॅग देतात. यापैकी तुमच्या सोयीच्या आणि विश्वासाच्या फास्टॅगची निवड तुम्ही करू शकता.

FASTags साठी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांचे विद्यमान FASTags बंद करावे लागतील आणि 15 मार्च नंतर नवीन उघडावे लागतील, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या 31 जानेवारीच्या निर्देशानुसार आहे.

सुरुवातीला RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर नवीन ग्राहकांना ऑनबोर्ड करण्यास मनाई केली होती, परंतु नंतर मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

Paytm FASTag वर पर्याय

NHAI FASTag: तो बँक-तटस्थ आहे, म्हणजे खरेदी केल्यावर तो विशिष्ट बँकेशी जोडलेला नाही. तुम्ही ते टोल प्लाझा, पेट्रोल पंप, ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा My FasTag ॲप आणि ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सारख्या नियुक्त पॉईंट्सवरून मिळवू शकता. ICICI बँक/HDFC बँक/SBI/कोटक महिंद्रा बँक FASTags: प्रत्येक सावकाराच्या बाबतीत, तुम्ही संबंधित सावकाराच्या वेबसाइटवर किंवा शाखेला भेट देऊन FASTag साठी अर्ज करू शकता.

Leave a Comment