PF News : पी एफ खात्यातून काढता येणार फक्त 3 दिवसांत पैसे

PF Amount Withdrawal News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याचे दावे आता फक्त तीन दिवसांत निकाली काढले जातील. यामुळे गरजवंतांना मोठा दिलासा मिळणार आहे.

phonePe द्वारे तात्काळ मिळवा 50,000/- रुपये कर्ज, पहा प्रोसेस

नवीन सुविधेमुळे, क्लेम सेटलमेंटची कालावधी 10 दिवसांवरून 3 ते 4 दिवसांपर्यंत कमी केली जाणार आहे. तसेच, ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्यांना पीएफ खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. याआधी ही मर्यादा 50 हजार रुपये होती.

राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निवारण त्रुटी संदर्भात प्रस्ताव सादर करणे बाबत परिपत्रक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यासाठी ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट (ऑटो-मोड सेटलमेंट) सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे आता तीन दिवसांत पैसे खात्यात जमा होतील. सध्या या प्रक्रियेला 10 ते 15 दिवस लागतात.

10,000/- पगार असणाऱ्यांना SBI Bank देत आहे इतके Personal Loan

गंभीर आजारपणातील उपचार,शिक्षण, विवाह तसेच घरबांधणीसाठी पीएफमधून पैसे काढण्यासाठी केलेले दावे निकाली काढण्यासाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुरू केले आहे. यापूर्वी या दाव्यांच्या निपटारा करण्यासाठी अंदाजे 15 ते 20 दिवस लागत असत.

अधिक माहिती पहा

EPFO तून पैसे काढण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. कारण, ईपीएफ सदस्याची पात्रता, दाव्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, केवायसी परिस्थिती, वैध बँक खाते इत्यादींची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत अनेकदा अवैध दावे हे रद्द केले जातात किंवा नाकारले जातात. ही प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे आता हे सर्व कमी होणार आहे.

1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार

ह्या प्रक्रियेत, आगाऊ रक्कम काढण्यासाठी केलेला दावा आपोआप निकाली काढला जाईल. केवायसी, पात्रता आणि बँक खाते पडताळणी आयटी टूल्सद्वारे हे दावे निकाली काढले जातात. यामुळे क्लेम सेटलमेंट कालावधी 10 दिवसांच्या बदलात 3 ते 4 दिवसांमध्ये येते. ऑटो-मोड सेटलमेंटद्वारे सदस्य 2 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा केवळ 50 हजार रुपये होती.

नवीन प्रक्रियेअंतर्गत, पूर्ण न झालेला कोणताही दावा रद्द केला जाणार नाही किंवा नाकारला जाणार नाही. हा दावा दुसऱ्या स्तरावरील तपासासाठी आणि मंजुरीसाठी पुढे नेण्यात येईल आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल.ऑटो मोड अंतर्गत पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी, ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल. यासाठी सदस्याने फॉर्म- 31 ऑनलाइन भरून सबमिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दावा दाखल करताना काय करावे?

  • यूएएन आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा. ‘ऑनलाइन सेवा’वर ‘क्लेम’ विभाग निवडावा.
  • तुमच्या बँक खात्याची पडताळणी करा. ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’वर क्लिक करा.
  • पुढील पेजवर अॅडव्हान्स फॉर्म ३१ निवडावा. ज्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे ते निवडावे.
  • किती पैसे, काढण्याचे कारण व पत्ता भरावा. चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा. संमती देऊन ‘आधार’शी पडताळणी करावी लागेल. प्रक्रिया केल्यानंतर दावा मंजुरीसाठी नियोक्त्याकडे जाईल.
  • ऑनलाइन सेवेअंतर्गत दाव्याची स्थिती तपासता येईल.

Leave a Comment