Police Bharti 2024 : पोलीस भरती 2024 करिता अर्ज करण्यास मुदतवाढ

Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात विविध पदांच्या भरतीसाठी 01 मार्च 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरती मंडळाने 05 मार्च 2024 रोजी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली होती तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 होती.

परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 एप्रिल 2024 करण्यात आली आहे.

म्हणजेच आता पोलिस भरती प्रक्रिया 2024 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा, मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, असे कळवण्यात आले आहे.

अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई यांचेकडून दिनांक 26/03/2024 रोजी अर्ज करण्यास मुदतवाढ देणेबाबत पत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

पोलिस भरती 2024 जाहिरात पहा

नवीन माहिती येथे पहा

ऑनलाईन अर्ज लिंक

एकूण पदे – 17,471

पदाचे नाव – पोलिस कॉन्स्टेबल

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

वेतन – 21,700/- ते 69,100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकClick here

Leave a Comment