राज्यातील या कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ करणे संदर्भात दि. 26/03/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

DA Hike Shasan Nirnay : कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ करणे संदर्भात दि. 26/03/2024 रोजी विधि व न्याय विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मागील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% टक्के करण्यात आला म्हणजे एकूण 4% वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर विधि व न्याय विभाग अंतर्गत आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. 01/01/2024 पासून 50% महागाई भत्ता दर अनुज्ञेय राहील असे सदर शासन निर्णय अन्वये निश्चित केले आहे.

न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. 01/01/2024 पासून महागाई भत्ता वाढ ही 4% करण्यात आली असून सदर अधिकारी यांना सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे.

लवकरच राज्यातील इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 4% महागाई भत्ता वाढ होणार आहे असे विविध वृत्त माध्यमांद्वारे समजले आहे. त्याबाबत देखील अपडेट देण्यात येईल.

26/03/2024 रोजीचा शासन निर्णय पुढे पाहा

शासन निर्णय पहा

येथे क्लिक करा

Leave a Comment