खूषखबर ! पोस्टात मिळतोय ७९५ रुपयांत २० लाखांचा विमा

Post Office Insurance Scheme : एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर कुटुंबावर आर्थिक डोंगर कोसळतो, तर त्या व्यक्तीला शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. यासाठी टपाल विभागाने ७९५ रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज एलायंज विमा कंपन्यांसोबत एक विमा योजना आणली आहे.

हा अपघाती विमा असून टपाल विभागाकडून उतरविण्यात येतो. यामध्ये टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम ३९९ रुपये आणि बजाज एलायंजला ३९६ रुपये प्रीमिअम असे ७९५ रुपयात २० लाखांचा अपघात विमा मिळू शकतो. विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी १०-१० लाख रुपयाचा लाभ मृतांच्या वारसांना दिला जातो.

अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला १०-१० लाख रुपये दिले जातात. त्याप्रमाणे अर्धांगवायू झाल्यास तितकाच लाभ त्या व्यक्तीस मिळतो.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते आवश्यक आहे. तसेच योजनेविषयी अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्या.

Leave a Comment