सोशल मीडियावर रील्स बनवणाऱ्यांना आता द्यावा लागणार इतका इन्कम टॅक्स, पहा सविस्तर माहिती

Reels Tax Rule : देशात शेती उत्पादन सोडता सर्व ठिकाणी होणाऱ्या उत्पादन कमाईवर इन्कम टॅक्स भरावा लागतो.

सध्या सोशल मीडियावर लोक जास्त अग्रेसिव आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक अनेक प्रकारच्या रिल्स बनवतात, आणि चांगले उत्पन्न कमावतात, सोशल मीडिया सध्या अनेकांचे कमाईचे साधन बनले आहे.अश्या प्रकारच्या इंस्टाग्राम, फेसबुक वर रील्स बनवणाऱ्यांना आता इथून पुढे इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे, तुमची कमाई किती त्यांच्यासाठी किती टॅक्स लागेल ती टक्केवारी विषयी सविस्तर माहिती पुढे पहा.

वार्षिक उत्पन्नद्यावा लागणारा टॅक्स
2.5 लाखापर्यंत 0%
2.5 ते 5 लाखापर्यंत5%
5 ते 10 लाखापर्यंत20%
10 लाखांहून अधिक 30%

जीएसटी आकारणी

आयकरा व्यतिरिक्त रिल्स बनवणाऱ्याना जीएसटी देखील भरावा लागू शकतो. वार्षिक उत्पन्न 20 लाखांपेक्षा अधिक असल्यास त्यांना 18 टक्के जीएसटी भरावा लागतो. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीही करावी लागते. ते जीएसटी भरण्यास पात्र असतात.

रिल्स बनवणाऱ्याना देत असलेला सल्ला, प्रशिक्षण, आदी सेवांसाठी घेतलेल्या मूल्यावरही जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे वजावटीचा लाभ घेण्यासाठी आणि कर दायित्व कमी करण्यासाठी या व्यक्तींनी खर्चाच्या नोंदी नेमकेपणाने ठेवल्या पाहिजेत.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून instagram वर जास्त प्रमाणात लोक रिल्स बनवतात. तुम्ही पण जर सोशल मीडियाला कमाईचे साधन मानले असेल किंवा कमाई करत असाल तर वरील प्रमाणे टॅक्स तसेच जीएसटी भरावी अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. अश्या प्रकारच्या कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते.

Leave a Comment