सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या RTE 25 टक्के प्रवेश, शाळा नोंदणीबाबत शासन परिपत्रक

RTE Registration 2024-25 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या RTE 25 टक्के प्रवेश, शाळा नोंदणीबाबत दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश, शाळा नोंदणीबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय कडून सदरील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 सुधारित अधिसूचना दिनांक 09 फेब्रुवारी 2024 अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणार नाही तसेच आरटीई 25 टक्के पोर्टलवर शाळा नोदंणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

तथापि, ज्या शाळा अदयापपर्यत आरटीई पोर्टलवर 25 टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी केलेली नाही अशा शाळांना आपल्या स्तरावरुन सक्त ताकीद देण्यात यावी. आरटीई 25 टक्के पोर्टलवर आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र असणाऱ्या शाळा नोंदणी केलेली नसल्यास त्यास वैयक्तीक आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक 16 जानेवारी 2018 मधील तरतूदीनुसार शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

शासन परिपत्रक पहा

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, मनपा/नपा सर्व यांना सदरील परिपत्रकानुसार कळवण्यात येत आहे.

नवीन माहिती येथे वाचा

Leave a Comment