7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत दि. 28 मे 2024 रोजी शासन निर्णय (GR)

7th Pay Commission : 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत दि. 28 मे 2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे.

दिनांक 02.03.2019 च्या शासन निर्णयान्वये 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 01.01.2016 पासून लागू करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या दिनांक 02.03.2019 च्या शासन निर्णयान्वये अधिकाऱ्यांना 10, 20, व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला, दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या “वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक (माहिती) / जनसंपर्क अधिकारी गट-अ (कनिष्ठ),” संवर्गातील तसेच “सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने गट-ब” संवर्गातील सोबतच्या यादीत परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे. परिशिष्ट-अ मधील अधिकाऱ्यांना गट-अ (वरिष्ठ) एस 23: 67,700-208700 ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे. तसेच परिशिष्ट-ब मधील अधिकाऱ्यांना गट- अ (कनिष्ठ) एस 20 : 56100-177500 ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे.

तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चतीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतनश्रेणीत त्यांना भविष्यात नियमित (कार्यात्मक) पदोन्नती मिळाल्यावर पुन्हाः वेतननिश्चितीचा लाभ देय होणार नाही.

सदर कर्मचाऱ्यांचे नाव कनिष्ठ (मूळ) संवर्गाच्या ज्येष्ठता सूचीत राहील आणि सेवा प्रवेश नियमातील तरतूदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नतीसाठी त्यांच्या नावांचा विचार करण्यात येईल. सदर लाभ मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्याने नियमित पदोन्नती नाकारल्यास अथवा पदोन्नतीसाठी अपात्र ठरल्यास या योजनेअंतर्गत दिलेला उपरोक्त पदोन्नतीचा लाभ त्याला मिळणार नाही व त्यास त्याच्या मूळच्या पदावर पदावनत करण्यात येईल.

सदर कर्मचाऱ्यांना त्यांना वर नमूद केलेल्या अटी मान्य असल्याचे बंधपत्र सादर करावे. तसेच या आदेशाच्या अनुषंगाने वरिष्ठ वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी सदर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प द्यावा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करुन त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक व वेतन संरचनेनुसार देण्यात यावा.

शासन निर्णय पहा

Leave a Comment