राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत दिनांक 21/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

State employees GR : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत दिनांक 21/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि. 01/04/2010 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आश्वासित प्रगती योजना शुद्धिपत्रक

वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०२/प्र.क्र.४४/सेवा-३. दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सवा(३) “विवक्षित सेवाकालावधीनंतर, संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचनेचा (Non functional pay structure) मंजूर करण्यात आलेला / देणारा लाभ हा वा योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल. उदा. मंत्रालय/विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना बार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतनसंरचना” हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात येत आहे.

तसेच, वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २स्क(१) मधील “तथापि, या योजनेतील पहिला लाभार्थी म्हणून ज्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवाकालावधीनंतर, त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदा-यांत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उस्य वेतनसंरवना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्य वेतनसंरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल.

शासन निर्णय

Leave a Comment