या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती चे वय 60 वर्षे करणेबाबत शासन निर्णय निर्गमित

State employees retirement age GR : सध्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय साधारणतः हा 58 वर्षे ठरवण्यात आलेले आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत शासन तयारीत आहे; परंतु काही ठिकाणावरून या निर्णयास विरोध केला जात आहे.

राज्यातील कृषि विद्यापीठाअंतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे वयावरुन 60 वर्षे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागा मार्फत दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील कृषि विद्यापीठामधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षावरुन 62 वर्षे करण्यात आली आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालये / शासकीय तंत्र महाविद्यालये/पदवी संस्था या राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे वयावरुन 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.5527-5547/2013 यामध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेमध्येबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला राहतील, असा निर्णय दिलेला आहे.

राज्यातील कृषि विद्यापीठांमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रिडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वर्षे वयावरुन 60 वर्षे करण्यात येत आहे.

त्या संदर्भातील शासन निर्णय पुढील प्रमाणे

शासन निर्णय

Leave a Comment