राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मानधनात वाढ, दि. 20/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

Increase salary of contract employees : राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्ती/सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी वितरीत करणेबाबत दिनांक 20/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

संभाजीनगर येथील दिनांक 16.09.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती Community Resource Person-CFRP) / प्रेरिका (CR) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पद्धतीने मुल्यमापन करुन कमाल 6000/- रुपये दरमहा मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्य:स्थितीत “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करून अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी Revolving Fund) वितरीत करण्यात येतो.

यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना अन्वये स्वयंसहाय्यता गटाची वर्गवारी करून “अ” वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना 30000/- रुपये0व वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत संदर्भाधिन क्र.1 शासन निर्णय निर्गमित करणात आला आहे.

सन 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटाना फिरता निधी अतिरिक्त राज्य हिस्सा (25019182) याकरिता केलेल्या तरतूदीतून 29898 लक्ष रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात येत आहे.

शासन निर्णय

Leave a Comment