राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास राज्य सरकार तयार; परंतु निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यास हरकत म्हणून मुख्यमंत्री यांना एक महत्वाचे पत्र

State Employees Retirement Age Update : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सध्या सेवा निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे, राज्य शासन कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास तयार आहे; परंतु त्या संबंधात हरकत म्हणून 16 फेब्रुवारी 2024 ला एक पत्र मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरुन 60 वर्ष न करणेबाबत मुख्यमंत्री यांना जयंत राजाराम पाटील विधानसभा सदस्य, महाराष्ट्र यांनी पुढील प्रमाणे पत्र सादर केले आहे.

रेल्वेत 9000 पदांसाठी नोकरीच्या संधी

शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून 60 वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने शासन सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरु उमेदवारांना शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी हिरावली जाईल आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. तसेच, ज्यांच्याकरिता शासन सेवेत प्रवेशाचा अंतिम 2 संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमूळे अपात्र होतील. या सर्वच गोष्टींमूळे राज्यातील तरुण वर्गात निराशा असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी योजना लागू करणे संदर्भात 14/02/2024 रोजिचे महत्वाचे पत्र

सद्यस्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठया प्रमाणात कुंठीतता असल्याने शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठीततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही. यामुळे अधिकारी /कर्मचारी नाउमेद होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. तसेच, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढते त्यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढेल.

सद्यस्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना नियतकालिक वेतनवाढ मिळाल्यानेत्यांचे मासिक वेतन जास्त आहे. त्यांच्याऐवजी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल. त्यामुळे शासनाच्या वेतनावर होणा-या खर्चावर बचत होईल. तसेच, 2 वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्तीवेतन व इतर अनुषांगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात माझ्याशी अनेक अधिकारी / कर्मचारी व संघटनेमधील पदाधिकारी यांनी चर्चा करुन काही मुठभर व्यक्तींच्या फायद्यासाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम युवक वर्गावरील शासकीय सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आपणास विनंती.

सदरील पत्र येथे पहा

Leave a Comment