राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्वाचे शासन परिपत्रक जारी

State Government employees payment update : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्वाचे शासन परिपत्रक दिनांक 19 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागा कडून जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रक नुसार विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे (सर्व), अधिदान व लेखा अधिकारी मुंबई, वरिष्ठ कोषागार अधिकारी (सर्व), जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व), उपकोषागार अधिकारी (सर्व) यांना सदर परिपत्रक अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेटणाबाबत ई-कुबेर प्रणाली कार्यान्वित करणेबाबत कळवले आहे.

उपरोक्त विषयास अनुसरुन संचालनालय, लेखा व कोषागारे अधिनस्त कार्यरत सर्व कार्यालयांना सुचित करण्यात येते की, आर्थिक वर्ष सन 2024-2025 दि. 01.04.2024 पासून (VPDAS व ।-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने e-Kuber प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय (ECS, NEFT, CMP, CMP Fast Plus etc.) आर्थिक वर्ष 2024-2025 च्या प्रदानाकरिता दि.01.04.2024 पासून बंद (Deactivate) करण्यात येतील. सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी सुचित केल्यानुसार e-Kuber प्रणाली दि. 01.04.2024 पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी असे दीपा देशपांडे संचालक लेखा व कोषागारे,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदरील परिपत्रक द्वारे राज्यातील विविध वेतन सबंधित कार्यालयांना कळवले आहे.

शासन परिपत्रक

Leave a Comment