Sunroof वाली ही भन्नाट कार !! फक्त एक लाखात आणा घरी

Sunroof वाली भन्नाट कार सध्या मार्केट मध्ये विक्रीस उपलब्ध आहे, ह्युंदाई कंपनीची एक्सटर ही एक भन्नाट कॅम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. या कारच्या बेसिक मॉडेलमध्येही एकाहून एक सरस सेफ्टी फिचर्स आहेत. या कारच्या हायर व्हेरिएंटमध्ये अधिक फिचर्स असून ही कार खरोखरच एक पैसा वसूल कार आहे. तुम्हालाही ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) विकत घ्यायची असेल तर तुम्ही केवळ एका लाखाच्या डाऊन पेमेंटवर ही कार घरी आणू शकता. या कार विषयी माहिती पुढे पाहुयात. Hyundai Exter Car

ह्युंदाई एक्सटर ही या कार सेगमेंटमधील पहिली अशी कार आहे ज्यामध्ये वॉइस इनबिल्ड इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आलं आहे. या कारमध्ये ड्युएल डॅशकॅम, 6 एअरबॅग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइण्ट सीटबेल्डसारखे फिचर्स अगदी बेस व्हेरिएंटमध्येही देण्यात आले आहेत. या कारमध्ये 60 हून अधिक कनेक्टेड फिचर्स आहेत हे ही कारचं वैशिष्ट्य आहे.

Hyundai Exter मध्ये 1.2 लीटरचं नॅचरली एस्पीरेटेड पेंट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81 बीएचपीची पॉवर आणि 114 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता असलेले आहे. कंपनीने सीएनजीमध्येही या कारचा पर्याय उपलब्ध करुन दिली आहे. सीएनजी इंजिन 68 बीएचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क निर्माण करते. पेट्रोल व्हेरिएंटच्या ह्युंदाई एक्सटरचं मायलेज 19.4 किलोमीटर प्रती लिटर इतके आहे. तर सीएनजी व्हेरिएंटचं इंजिन 27.1 किलोमीटर प्रती किलोचे मायलेज देते.

Hyuandai Exter चे एकूण 7 व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) कनेक्ट या 7 व्हेरिएंटचा समावेश आहे. ह्युंदाई कंपनीने आपल्या एक्सटर या एसयूव्हीवर 3 वर्षांसाठी अमर्यादित किलोमीटरवर वॉरंटी दिली आहे. या कारबरोबर 7 वर्षांच्या अतिरिक्त वॉरंटीचाही पर्याय कंपनीने दिला आहे. ही कार 6 मोनोटोन आणि 3 ड्युएल टोन रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. ह्युंदाई एक्सटरची एक्स शोरुम किंमत 6.13 लाख रुपयांपासून 10.28 लाखांपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment