शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे बाबत दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

State employees Retired Pay New shasan Nirnay : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्याविषयी गठीत अभ्यास समितीस अंतिम मुदतवाढ देण्याबाबत दिनांक 23/02/2024 रोजी महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्याविषयी संदर्भाधीन शासन निर्णय अन्वये अभ्यास समिती गठीत केली आहे. सदर अभ्यास समितीने शासनास अहवाल सादर करण्याची मुदत दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी संपुष्टात आली असल्याने दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 25 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती. सदरची मुदत संपुष्टात आल्याने दिनांक 31 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती. सदर अभ्यास समितीचे कामकाज अंतिम टप्यात असल्याने, समितीला शासनास अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव समितीस अंतिम मुदतवाढ देण्यासाठी सदरील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे या विषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता संदर्भाधिन दिनांक 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये गठित अभ्यास समितीचे कामकाज अंतिम टप्यात असल्याने शासनास अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीला दोन महिन्याची म्हणजेच दिनांक 26 एप्रिल 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

या संबंधीचा शासन निर्णय पुढील प्रमाणे

शासन निर्णय पहा

Leave a Comment