खूशखबर !!… नमो शेतकरी योजनेचा, 2000/- रुपयाचा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात, शासन निर्णय आला

Namo Shetkari Yojna GR : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्याबाबत दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. 6000/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु. 6000/- इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास राज्य सरकारच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

तसेच सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्र. (2) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत योजने अंतर्गत संदर्भ क्र. (3) अन्वये पहिला हप्ता (माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1720 कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्र. (4) अन्वये दुसरा हप्ता (माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण रु.3512 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता संचालक (वि.प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र. (५) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत तिसरा हप्ता (माहे डिसेंबर ते मार्च) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. 2000 कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यास्तव नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत तिसरा हप्ता (माहे डिसेंबर ते मार्च) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. 2000 कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासना निर्णय अन्वये मान्यता देण्यात येत आहे. सदरील शासन निर्णय पुढे पाहा.

शासन निर्णय

Leave a Comment