Tukda bandi kayda : तुकडा बंदी कायद्यात झाले मोठे बदल, आता गुंठा भर जमीन होणार नावावर

Tukda bandi kayda latest News : राज्य शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम २०१५ अन्वये तुकडा बंदी कायदा महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक काढून अंमलात आणला आहे.

विभागीय आयुक्त (सर्व) (कोकण/पुणे/नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती व नागपूर.) आणि जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व) यांना सबंधित परिपत्रक बाबत कळवले आहे.

तुकडा बंदी कायद्याबाबत 14/03/2024 चे परिपत्रक पुढील प्रमाणे

मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत नियम, १९५९ मध्ये सुधारणेबाबत प्रारूप अधिसूचना संदर्भाधिन क्र. १ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात प्राप्त सूचना/आक्षेप यांस अनुसरून सदर नियम अंतिम करण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना दिनांक १४/०३/२०२४ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

तुकडा बंदी कायद्याबाबत अधीसूचना राजपत्र येथे पहा

येथे डाऊनलोड करा

Leave a Comment