तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही? घरी बसून असे ऑनलाइन तपासा

Voter list 2024 : भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असायला हवे. मतदार यादीत आपले नाव तपासणे ही एक सोपी प्रक्रिया आहे, परंतु अनेकांना ही प्रक्रिया माहीत नाही. या लेखात आपण मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासू शकता ते पाहणार आहोत.

असे तपासा ऑनलाईन मतदार यादीत तुमचे नाव

  • सर्वप्रथम तुम्हाला NVSP च्या https://www.nvsp.in/ वेबसाइटवर जावे लागेल.
  • मुख्यपृष्ठावरील “Electoral Roll” या टॅबवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला “Search in Electoral Roll” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमचे राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि जन्मतारीख यासारखे तपशील प्रविष्ट करा.
  • वरील माहिती प्रविष्ट केल्यानंतर, “Search” या बटणावर क्लिक करा.

मतदार यादीत नाव तपासणीसाठी येथे क्लिक करा

तुमचे नाव मतदार यादीत असल्यास, तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, लिंग, मतदार ओळख क्रमांक (EPIC क्रमांक) आणि मतदान केंद्र तपशील असलेले एक पृष्ठ दिसेल.

ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन प्रक्रियेसाठी, तुम्हाला तुमच्या स्थानिक मतदान केंद्राला भेट द्यावी लागेल. मतदान केंद्रावर तुम्ही मतदार यादीची प्रत मिळवू शकता आणि तुमचे नाव पाहू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment