मानधन तत्वावरील (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

Contract Basic Employees GR : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर “प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत” -लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई व वाहनचालक पदावर करार पध्दतीने मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना, इतर महानगरपालिकांमध्ये ज्याप्रमाणे रोजंदारीवरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे.

त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेमधील करार पध्दतीवरील आर.सी.एच. (RCH) फेज-२ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना, नवी मुंबई महानगरपालिका आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदावर नियमित समावेशन करणेबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्याची आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी विनंती केली आहे.

त्यानुसार दिनांक 04 मार्च 2024 रोजी नगर विकास विभाग मार्फत लिपिक-5, डेटा एंट्री ऑपरेटर-१, शिपाई-४ व वाहनचालक-१ या पदावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय

Leave a Comment