जिल्हा परिषद मार्फत 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन करिता 31 मार्चपर्यंत अर्ज करा

ZP Xerox & Shilai machine form : जिल्हा परिषद मार्फत 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन करिता अर्ज सुरू झाले आहेत.

जिल्हा परिषद योजना 2024 मार्फत झेरॉक्स आणि शिलाई मशीन करिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

झेरॉक्स मशीनसाठी 100 टक्के अनुदान

झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय सुरू करता येतो. प्रत्येक व्यक्तीला हा व्यवसाय करणे सहज शक्य होते. यामुळे 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यास सुरू झाले आहेत.

शिलाई मशीनसाठी 100 टक्के अनुदान

शिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला, पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात, या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदान दिले जाते.

स्प्रिंकलरसाठी 90 टक्के अनुदान

जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात स्प्रिंकलरसाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो.

हे वाचा 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 : पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 17471 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

जिल्हा परिषद योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

 • जातीचा दाखला
 • दिव्यांग प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • ग्रामसभेचा ठराव
 • शाळा सोडल्याचा दाखला यासह इतर आवश्यक कागदपत्रे

जिल्हा परिषद योजना 2024 करिता पात्रता

 • लाभार्थी हा मागासवर्गीय असावा किंवा दिव्यांग असणे गरजेचे आहे.
 • लाभार्थ्यांचे वय हे 18 ते 60 वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे.
 • तसेच एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असावे.

अर्ज कसा करावा

 • जिल्हा परिषद योजना 2024 करिता लाभार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
 • लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे अर्ज करावा.

सध्या ही योजना जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जालना मार्फत सुरू आहे, इतर जिल्ह्यात सुध्धा ही योजना लवकरच सुरू होईल, त्याकरिता लाभार्थ्यांनी सबंधित जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment