राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती.

7th Pay Commission Arrears news : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती पुढे देत आहोत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचे 4 हप्ते अदा करण्यात आले आहेत; परंतु कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता कधी पडेल? तसेच महागाई भत्ता हा 46% वरून 50% कधी होईल याबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती पुढे तुम्हाला देणार आहोत.

माहे जून 2024 च्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता देणे अपेक्षित आहे. ज्यावेळेस राज्य कर्मचाऱ्यांना 2019 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता; त्यावेळेस एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता, त्यामध्ये असे कळवण्यात आले होते की 2019 ते 2023 पर्यंत 7 व्या वेतन आयोगाचे सर्व हप्ते टप्प्याने अदा करावेत.

परंतु 2020 मध्ये कोरोना काळात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला नाही, म्हणून माहे जून मध्ये 7 व्या वेतन आयोगाचा 5 वा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळणे निश्चित आहे; परंतु अद्याप पर्यंत तसा काही शासन निर्णय नाही; पण थोड्या दिवसात तोही निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

म्हणजेच राज्य कर्मचाऱ्याना 7 व्या वेतन आयोगाचा 5 वा हप्ता आणि महागाई भत्ता 50% दराने मिळणे अपेक्षित आहे.

केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळत आहे, त्याच प्रमाणे आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणे बाबत निर्णय होऊ शकतो.

म्हणजेच माहे जूनच्या वेतनासोबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 5 वा हप्ता तसेच 4% महागाई भत्ता मिळू शकतो, असे वृत्त आहे.

Leave a Comment