DA Hike : राज्यातील या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना 4% महागाई भत्ता वाढ मंजूर

DA Hike : राज्यातील या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना 4% महागाई भत्ता वाढ मंजूर करणे बाबत महत्वाचे पत्रक सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत दिनांक 13 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना आताच 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

या पत्रका अन्वये महाराष्ट्र राज्य सेवेत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांना 4 टक्के महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार त्यांचा एकूण महागाई भत्ता हा 50 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांना दि. 01-01-2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

या संदर्भातील शासन निर्णय पुढे पाहा

शासन निर्णय

Leave a Comment