जानेवारी 2024 चे वेतन व भत्ते, उर्वरित 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते आणि इतर थकबाकी अदा करणे बाबत दिनांक 29/01/2024 रोजी चे शासन परिपत्रक जारी

Government employees Arrears : जानेवारी 2024 चे वेतन व भत्ते, उर्वरित 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते आणि इतर थकबाकी अदा करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वरील प्रमाणे देयके अदा करणे करिता शासन स्तरावर शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या द्वारे दिनांक 29/01/2024 रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

शासन परिपत्रक 

या शासन परिपत्रक अन्वये 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, 2024 या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी, 2024 या ज्ञापनाद्वारे लेखाशिर्ष 222020173/36 मध्ये उपलब्ध करुन दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा 3 रा हप्ता व 4 या रा हप्तासाठी, तसेच वैद्याकोय देयके व  इतर देयके अदा करणे बाबत सुचवले आहे.

सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने 4 था हप्ता, व अशंराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी. उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती या शासन परिपत्रक अन्वये देण्यात येत आहे.

शासन परिपत्रक येथे पहा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment