महाराष्ट्रात 21,678 शिक्षक पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, Teacher Bharti 2024

Maharashtra Government Teacher Bharti 2024 : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील 1258 शाळांमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि खाजगी संचालित शाळांमध्ये 21,678 पदांसाठी दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2024 साठी अधिसुचना जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवार या पवित्र पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – शिक्षक

एकूण रिक्त जागा – 21678

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा

मूळ जाहिरात येथे पहा

शिक्षक भरती 2024 ची अर्ज लिंक

या भरतीद्वारे, बहुतेक मराठी शाळांमध्ये एकूण 18,373 पदांवर शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. यानंतर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये 1850, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 931 आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये 410 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. याशिवाय उर्वरित भरती तामिळ, बंगाली आणि तेलुगू शाळांमध्ये केली जाणार आहे.

महाराष्ट्रात एकूण 35 जिल्हा परिषद शाळांमध्ये 12522 पदे आहेत. महापालिकेच्या 18 शाळा असून त्यात 2951 पदे आहेत. तर 82 नगरपरिषदेच्या शाळांमध्ये 477 पदे आणि 1,123 खाजगी शाळांमध्ये 5,728 पदे भरली जाणार आहेत.

या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार मूळ जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची तारीख 08 फेब्रुवारी 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment