लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख रुपये

Maharashtra Lek Ladki Yojana : मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी‘ ही नवीन योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्म दरवाढ, शिक्षणास प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे मुख्य उद्देश ठेवून ही योजना सुरू केली आहे.

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून, लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रोख रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणासह सक्षमीकरणाला बळ मिळणार आहे. राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणातील तफावत कमी करून मुलींचा जन्म दर वाढवणे, त्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सुकन्या समृद्धी, माझी कन्या भाग्यश्री यासारख्या योजनांचा समावेश आहे. मात्र, या योजनांना अपुरा प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2023 पासून शासनाने लेक लाडकी ही नवीन योजना सुरू केली आहे.

या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे मुलींना उच्चशिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण घेणे शक्य होणार आहे. परिणामी, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहणार असल्याने त्यांचे सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेचा उद्देश

 • मुलींचा जन्म दरवाढ
 • शिक्षणास प्रोत्साहन देणे
 • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे
 • कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे

लेक लाडकी योजने करिता पात्रता

 • लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
 • मुलींचे वय जन्मापासून 18 वर्षे असावे.
 • या योजनेत कार्डधारकांना फक्त पिवळा किंवा केशरी रंगाचा शिधा दिला जाईल.
 • या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे.
 • या योजनेचा लाभ फक्त अर्जदाराच्या पालकांनाच मिळणार आहे.
 • मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे

 • लाभार्थीचा जन्माचा दाखला
 • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला
 • लाभार्थी व पालकाचे आधार कार्ड
 • माता व बाळाच्या संयुक्त बँक पासबुकची झेरॉक्स
 • रेशन कार्ड
 • 18 पूर्ण झाल्यानंतर मतदान ओळखपत्र
 • संबधित टप्प्यातील लाभासाठी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
 • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

लेक लाडकी योजना अधिकृत संकेतस्थळ

lek ladki yojna apply form

 • तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
 • राज्यात ही योजना अद्यापही सरकारने लागू केलेली नाही. या योजनेत अर्ज करण्याची माहिती शासनामार्फत लागू होताच, या योजनेंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्जासंबंधीची माहिती दिली जाईल.
 • त्यामुळे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि लाभ मिळवू शकता.

Leave a Comment