खूशखबर !!.. म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी आज सोडत, Mhada lottery

Mhada lottery : कोकण मंडळाने म्हाडा गृहनिर्माण, पंतप्रधान आवास योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना आणि प्रथम प्राधान्य योजनेतील 5311 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला सप्टेंबर 2023 मध्ये सुरुवात केली. मूळ वेळापत्रकानुसार 7 नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच कोकण मंडळाने त्याला मुदतवाढ दिली. म्हाडाच्या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली होती.

👆👆 5 दरवाजे आणि सनरुफसह नवीन Mahindra Thar बाजारात येणार

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.

सोडतीचे ठिकाण – राम गणेश गडकरी नाट्यगृह, ठाणे

दिनांक व वेळ – 24 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाजता.

https://www.facebook.com/mhadaofficial या अधिकृत फेसबूक पेजवर बघण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी तुम्हाला म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजल्यानंतर पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमातून विजेता ठरल्याबाबतच मेसेज त्यांनी अर्जसोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर लगेच प्राप्त होणार आहे.

म्हणजेच आज रोजी ही सोडत काढण्यात येणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

7 नोव्हेंबर 2023 रोजी काढण्यात येणारी सोडत ही म्हाडाच्या घराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. पण प्रशासकीय कारणास्तव मंडळाने 13 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत पण रद्द केली होती. या सोडतीसाठी आता कोकण मंडळ सज्ज झाले आहे.

अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून मंडळाने पात्र अर्जांची यादीही प्रसिद्ध केली. पण सोडतीची तारीख जाहीर केली जात नव्हती. त्यामुळे 24 हजारांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली होती.

आज रोजी सोडत काढली जाणार असल्यामुळे बऱ्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार, म्हणजे आपले हक्काचे घर मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment