NPS खाते बंद करून, जुनी पेन्शन योजना (GPF) खात्यामध्ये रक्कम वर्ग करणे बाबत शासन निर्णय (GR)

Old pension scheme update : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यानी जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारल्यास, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील (NPS) त्यांची एकत्रित अंशदानाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात (PF) व्याजासह जमा केली जाईल.

राज्य मंत्रिमंडळाच्या 4 जानेवारीच्या बैठकीत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नोकरभरतीच्या जाहिरातीनुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी किंवा नवी निवृत्तीवेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भात वित्त विभागाने 5 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन लागू करायची आहे की नवीनच चालू ठेवायची आहे, त्यातील एक पर्याय निवडून, तो नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सादर करायचा आहे. जे अधिकारी, कर्मचारी जुन्या पेन्शन वेतन योजनाचा पर्याय स्वीकारतील, त्यांचे NPS खाते बंद करुन, भविष्य निर्वाह निधी खाते (PF) खाते उघडायचे आहे. NPS मध्ये अंशदानाच्या रुपाने जमा झालेली रक्कम व्याजासह कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या PF खात्यात जमा केली जाणार आहे.

शासन निर्णय

Leave a Comment