परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024

Parbhani city Mahanagarpalika bharti 2024 : परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, 15 वा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये विविध पदांच्या कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदसंख्या, सामाजिक आरक्षण, शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वय मर्यादा, मानधन व अटी शर्ती तसेच विहित अर्जाचा नमुना परभणी शहर महानगरपालिका संकेत स्थळ www.pcmcparbhani.org वर पाहू शकता.

पदाचे नाव – विविध पदे

एकूण पदे – 55

शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे, कृपया मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज व कागदपत्र स्वीकारण्याचा दिनांक –

दिनांक 10 / 02 / 2024 ते 16 / 02 / 2024 सकाळी 09.45 ते सांयकाळी 06.15 पर्यंत.

(सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहा)

जाहिरात येथे पहा

अर्ज फॉर्म

अधिकृत वेबसाईट 👇www.pcmcparbhani.org

उपरोक्त नमूद पदांसाठी पदनिहाय नमूद केलेल्या शैक्षणिक व इतर अहर्ता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उम्मेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

उम्मेद्वाराने परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांच्या स्व स्वाक्षांकित छाया प्रति जोडणे आवश्यक राहील.

उशिरा प्राप्त झालेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीसाठी पात्र व अपात्र झालेल्या उम्मेद्वाराची यादी सूचना फलकावर व वेवसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

पात्र उम्मेद्वारांची मुलाखती साठी सकाळी 11.00 वाजता नोंदणी करणे आवश्यक असेल.

मुलाखती दिवशी व वेळेवर गैरहजर असणाऱ्या उम्मेद्वाराला अपात्र करण्यात येईल.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजीस्ट ही पदे मुलाखत पद्धतीने भरण्यात येतील व इतर पदे गुणवत्ता यादी ने भरण्यात येतील.

उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात 6 महिने ते 11 महिने चा नियुक्ती आदेश देवून नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

उमेदवारांनी मूळ व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात पहा.

Leave a Comment