Police Bharti 2024 : कोणत्याही एकाच घटकात करता येणार अर्ज, पहा सविस्तर बातमी

Police Bharti 2024 : राज्यात एकूण 17,471 पोलिस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र उमेदवारांकडून दिनांक 05 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही भरती जाहिरात पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलिस, कारागृह पोलीस, रेल्वे पोलीस आणि रिझर्व्ह पोलिस बल (SRPF) अश्या पद्धतीने रिक्त जागा भरण्यासाठी प्रकाशित केली आहे. परंतु सर्वच घटकात उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत की नाही याबाबत वृत्त पत्रात बातमी आली आहे, ती पुढील प्रमाणे..

राज्यसरकारने यावेळी पोलिस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवाराला कोणत्याही एका घटकात केवळ एक अर्ज करता येणार आहे. याआधी वेगवेगळ्या घटकात (जिल्ह्यासाठी) अर्ज दाखल करून दोन-तीन शारीरिक चाचण्या देता येत होत्या. प्रत्येक उमेदवाराचे आधारकार्ड लिंक केल्याने आता तशा संधी संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक घटक निवडावा लागणार आहे.

एकूण 17,471 पदासाठीच्या पोलिस भरतीत पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी 26 घटकांत 9,595 जागा, राज्य राखीव पोलिस दलातील पदासाठी 19 घटकांमध्ये 4,349 जागा, चालक पदासाठी 26 घटकांमध्ये 1,686 जागा तर कारागृह पदासाठी 1,800 जागा उपलब्ध आहेत.

पोलिस भरतीसाठी 5 मार्च ते 31 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना पोलिस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ, चालक, कारागृह व बँडचालक अशा पाच पदांसाठी पात्र उमेदवार पाचही ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र एका पदासाठी कोणताही एकच घटक निवडावा लागणार आहे.

कॉन्स्टेबल पदाकरिताच्या 26 घटकांपैकी कोणत्याही एकाच घटकात अर्ज करता येईल. दुसऱ्या घटकांत अर्ज करू लागला तर आधीच्या अर्जासोबत आधार लिंक असल्याने दुसरा अर्ज स्वीकारला जात नाही. शारीरिक चाचण्या वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी लेखी परीक्षा राज्यभर एकाच वेळी घेतली जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट केले आहे.

पाच पदापैकी कॉन्स्टेबल, कारागृह या दोन पदांसाठी पात्रता समान असल्याने सरसकट उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. बँड चालकासाठी वादनकलेचे प्रमाणपत्र आणि चालकासाठी वाहन परवाना आवश्यक राहणार आहे. तर एसआरपीएफसाठी अजूनही केवळ मुलांनाच संधी आहे. लोहमार्ग पोलिस पद वेगळे काढून सहावा पर्याय देता आला असता तो सरकारने टाळला आहे.

आता आपल्या प्रवर्गासाठी कोणत्या घटकात किती जागा आहेत याचा अभ्यास करून आणि आपली गुणप्राप्तीची क्षमता बघून काळजीपूर्वक घटक निवडावा. असे भरती अभ्यासक विक्रम बोन्द्रे आणि गणेश सावंत यांनी आपले मत व्यक्त केले.

Leave a Comment